‘सिम्बा’ने जमवला २०० कोटींहून अधिकचा गल्ला

ranveer-singh
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ हा चित्रपट ‘गोलमाल’ प्रमाणे ‘सिंघम’ फ्रँचाईझी पुढे नेण्याचा हा शेट्टी फॉर्म्युला हिट ठरला असून अवघ्या दोन आठवड्यात शेट्टी स्टाईल मनोरंजन, जबरदस्त कलाकार असलेल्या ‘सिम्बा’ने बॉक्स ऑफीसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सिम्बाने भारतात आतापर्यंत तब्बल १७३.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्याचबरोबर भारताबाहेरील कमाई लक्षात घेता २०० कोटी रुपयांचा आकडा ‘सिम्बा’ने पार केला असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली आहे.

रणवीर सिंगचा ‘सिम्बा’च्या धडाकेबाज कामगिरीमुळे हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याच्या ‘बाजीराव मस्तानी’ने याआधी तिकीटबारीवर जोरदार कमाई केली होती. शुक्रवारी ९.०२ कोटी आणि शनिवारी १३.३२ कोटी रुपये मिळून ‘सिम्बा’ची एकूण कमाई १७३.१५ कोटी रुपये एवढी झाली आहे. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही ‘सिम्बा’ने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने विदेशात आठ दिवसांत ६३. २२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारत आणि भारताबाहेरच्या एकूण कमाईने २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

Leave a Comment