यापुढे ड्रायव्हिंग लायसन्सला देखील द्यावा लागणार आधार

aadhar
फगवाडा- यापुढे ड्रायव्हिंग लायसन्सला देखील आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक होण्याची शक्यता आहे. गैरव्यवहारांना आधार कार्ड लायसन्सला जोडल्यामुळे आळा बसू शकतो, असे मत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

आयकर परतावा, पॅन कार्ड आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी आधार बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ही माहिती फगवाडा येथे सुरू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये दिली. प्रसाद म्हणाले, कोणीही एखादा अपघात करून पळ काढतो आणि मग नव्याने वाहन परवाना बनवतो. पण ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्ड जोडले तर या गैरव्यवहारांना आळा बसेल. म्हणूनच लवकरच सरकार आधार-ड्रायव्हिंग लायसन्स लिंकिंग बंधनकारक करणार आहे. कारण या लिंकिंगनंतर तुम्ही तुमचे नाव बदलू शकता पण बोटांचे ठसे नाही. डिजीटल इंडिया कार्यक्रमामुळे शहरी आणि ग्रामीण भागातली दरी संपुष्टात आली आहे, असेही प्रसाद यावेळी म्हणाले.

Leave a Comment