भाजपच्या जाहीरनामा समितीत नारायण राणेंचा समावेश

narayan-rane
नवी दिल्ली- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी विविध समित्यांची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाचा पक्षाच्या जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आला आहे.

अमित शहा यांनी घोषित केलेल्या समित्यांमध्ये जाहीरनामा, प्रचार तसेच सामाजिक-स्वयंसेवी संस्था समितीचा समावेश आहे. जाहीरनामा समिती राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. निर्मला सीतारमण, अरूण जेटली, पीयूष गोयल या केंद्रीय मंत्र्यांसह २० जणांचा त्यामध्ये समावेश आहे.

२००५ मध्ये शिवसेनेला नारायण राणेंनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. राणेंनी गेल्या वर्षी कॉंग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे सदस्य बनलेले राणे भाजपवर नाराज असल्याची चर्चा असल्यामुळे राणेंची नाराजी दूर करण्यासाठी तसेच राणेंची समितीवर वर्णी लावून शिवसेनेला भाजपने अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Leave a Comment