विमानतळासारखी होणार रेल्वे स्थानकांची सुरक्षा, 20 मिनिटांपूर्वी मिळणार प्रवेश

railway
भारतीय रेल्वे आता देशभरातील रेल्वे स्थानकांवर विमानतळांप्रमाणे सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षा तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ते 20 मिनिटे आधी रेल्वे स्टेशनवर पोहोचावे लागणार आहे.

ही सुरक्षा व्यवस्था प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उत्तर प्रदेश होणार्याू कुंभमेळ्यासाठी प्रयागराज स्थानकावर कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर अगोदरच लागू करण्यात आले आहे. तसेच देशातील अन्य 202 रेल्वेस्थानकांवर ही प्रणाली लागू करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे रेल्वे सुरक्षा दलाची महासंचालक अरुण कुमार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

“ही योजना रेल्वे स्थानकांना सील करण्याची आहे. मुख्यतः रेल्वेस्थानकावरील प्रवेशबिंदू निश्चित करणे आणि त्यातील किती बंद ठेवता येतील, हे ठरविण्यात येईल. काही ठीकाणी कायमस्वरूपी सीमाभिंती बांधून त्या जागा बंद करण्यात येतील. काही ठिकाणी आरपीएफचे कर्मचारी तैनात करण्यात येतील. अन्यत्र बंद होणारे फाटक लावण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.

“प्रत्येक प्रवेश बिंदूवर आकस्मिक सुरक्षा तपासणी होईल. मात्र विमानतळांच्या उलट प्रवाशांना कित्येक तास कधी यावे लागणार नाही, तर केवळ गाडी सुटण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे यावे लागेल जेणेकरून सुरक्षा प्रक्रियेमुळे उशीर होऊ नये. केवळ सुरक्षा वाढणार आहे, सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment