प्रकाश राज बोलल्याप्रमाणे वागणारी व्यक्ती- कमल हासन

kamal-hasan
राजकारणात प्रवेश करून निवडणूक लढविण्याची घोषणा करणाऱ्या अभिनेता प्रकाश राज यांना अभिनेता व राजकारणी कमल हासन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाश राज बोलल्याप्रमाणे वागणारी व्यक्ती आहेत, असे हासन यांनी म्हटले आहे.

बंगळुरु सेंट्रल मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढविणार असल्याची घोषणा प्रकाश राज यांनी शनिवारी केली होती. त्यावर मक्कळ निधि मण्ड्रम या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या हासन यांनी ट्विटरवरून रविवारी प्रतिक्रिया व्यक्त केली.

“माझे मित्र प्रकाश राज यांना राजकारणातील प्रवेशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. बोलल्याप्रमाणे वागल्याबद्दल धन्यवाद,” असे कमल हासन यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राज यांना आम आदमी पक्षाने सुद्धा पाठिंबा दर्शविला असून सर्व चांगल्या लोकांनी राजकारणात यायला हवे, असे म्हटले आहे. “प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. आम आदमी पक्ष त्यांना खुला पाठिंबा देत आहे. बंगळुरु येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे,” असे पक्षाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

रजनीकांत आणि कमल हासन यांच्यानंतर राजकारणात प्रवेश करणारे प्रकाश राज हे तिसरे अभिनेते ठरले आहेत. भाजप, हिंदुत्ववादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने कठोर टीका करण्यासाठी ओळखले जातात. आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहोत, असे प्रकाश राज त्यांनी ट्विटरवरून नववर्षाच्या शुभेच्छा देताना जाहीर केले होते.

Leave a Comment