‘सूर्यवंशी’साठी रोहित शेट्टीच्या मदतीला धावले बोनी कपूर

rohit-shetty
नुकताच रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांनी रोहितच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटालाही भरभरुन प्रेम दिले आहे. केवळ २ आठवड्यांत या चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. रोहित शेट्टीने सिम्बाच्या माध्यमातून आपल्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची अधिकृत घोषणादेखील केली.

अक्षय कुमार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण रोहितला या चित्रपटाच्या शीर्षकासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. होय, ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, सलमान खानची ज्यात मुख्य भूमिका होती. त्यामुळे हे शीर्षक दिग्दर्शक विजय गलानी यांनी तेव्हाच रजिस्टर करुन ठेवले होते.

रोहितला हे शीर्षक याच कारणामुळे मिळणे कठीण होते. पण रोहितच्या मदतीला बोनी कपूर यांनी धावून येत विजय गलानी यांच्याशी संवाद साधल्यानंतर बोनी कपूर यांच्या मदतीमुळे चित्रपटाला हे शीर्षक मिळाले. या चित्रपटात पुजा हेगडे मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.