सुनील छेत्रीने गोल संख्येत लियोनेल मेस्सीला टाकले मागे

sunil
भारताचा स्टार फुटबॉलर सुनील छेत्री याने रविवारी त्याचा करिअरचा आणखीएक टप्पा पार केला. एशियन कप फुटबॉलमध्ये ग्रुप सामन्यात भारत आणि थायलंड यांच्या झालेल्या सामन्यात भारताने थायलंडचा ४ -१ ने पराभव केलाच पण त्याचबरोबर सुनील छेत्रीने दोन गोल करताना अर्जेन्टिनाचा महान खेळाडू लियोनेल मेस्सी याला मागे टाकत आंतरराष्ट्रीय लेव्हलवर त्याची गोल संख्या ६७ वर नेली. अबुधाबी येथे हा सामना झाला.

या सामन्यात ३४ वर्षीय छेत्रीने २७ मिनिटात पेनल्टीवर गोल केला तेव्हाच त्याने मेस्सीला मागे टाकले आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलवर गोल करणारा दोन नंबरचा अॅक्टीव खेळाडू होण्याचा मान मिळविला. मेस्सीने १२८ सामन्यात ६५ गोल केले आहेत तर क्रीस्तीयानो रोनाल्डोने १५४ सामन्यात ८५ गोल करून पहिल्या स्थानावर हक्क सांगितला आहे.

Leave a Comment