पेटीएमची पोस्टपेड सेवा लाँच

postpaid
मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म पेटीएमने त्यांची पोस्टपेड सेवा लाँच केली असून सध्या ती निवडक ग्राहकांनाच पुरविली जाणार आहे. यात युजर ६० हजार रुपयांपर्यंत प्रथम खर्च करून या खरेदीचे पैसे नंतर भरू शकणार आहे. या मध्ये युजर मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, मुव्ही तिकिट्स, पेटीएम ऑनलाईन मार्केटप्लेस शॉपिंग अशी सुविधा मिळवू शकणार आहे.

या सेवेचा वापर करून खरेदी केल्यावर युजरला महिन्याच्या १ ल्या तारखेला बिल दिले जाईल. ते ७ तारखेपर्यंत भरले गेले तर कोणताच एक्स्ट्रा चार्ज लावला जाणार नाही तसेच व्याज आकारले जाणार नाही. डिफॉल्ट केसमध्ये अकौंट डीअॅक्टीव्हेट केले जाईल असे समजते. बिल देताना एक ओटीपी किंवा पिनचा वापर करता येणार आहे. युजरने ऑर्डर रद्द केल्यास त्वरित रिफंड मिळणार आहे.

या शिवाय या सेवेवर फ्री मुव्ही तिकिट्स, कॅशबॅक व अन्य ऑफर्स दिल्या जाणार आहेत. युजरला पेटीएम पोस्टपेड अॅक्टीव्हेट करण्यासाठी पेटीएम अॅपवर लॉगइन करावे लागेल आणि त्यानंतर पोस्टपेड बॅनर वर क्लिक करावे लागेल असे समजते.

Leave a Comment