सिडनीचे क्रिकेट मैदान गुलाबी रंगात रंगले

pink
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पिंक कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एरवी हिरवेगार दिसणारे सिडनीचे मैदान चक्क गुलाबी रंगात रंगून गेल्याचे दिसले. यामागे कारण होते ते ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जागृतीचा संदेश हा सामना पाहत असलेल्या लाखो लोकांपर्यंत पोहोचविणे. यासाठी क्रिकेट आणि संस्कृती यांनी हातमिळवणी केली आणि मैदानावर १०० हून अधिक महिला गुलाबी साड्या नेसून आल्या.

इतकेच नव्हे तर पुरुषवर्गानेही गुलाबी फेटे, पगड्या, शर्ट, टोप्या घालून सक्रीय सहभाग नोंदविला. एनएसडब्ल्यूच्या मल्टीकल्चरल हेल्थ कम्युनिकेशन सर्व्हिस आणि अन्य संस्थांनी २०१४ पासून पिंक साडी प्रोजेक्ट सुरु केला आहे. या संस्थेच्या अध्यक्षा शांता श्रीनिवासन सांगतात २०१४ नंतर २०१६ मध्ये एक टीमने पिंक साडी इन कॉर्पोरेटची सुरवात केली. सुरवातीला भारत आणि श्रीलंका येथील महिलांना ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जागरूक करण्याचा तसेच ब्रेस्टची नियमित तपासणी करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा विचार होता.

नंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मक्ग्रा याची पत्नी जेन हिचे २००८ मध्ये याच रोगाने निधन झाल्यावर मक्ग्रा फौंडेशनकडून या अभियानात सहयोग दिला गेला. या मोहिमेला पाठींबा देण्यासाठी मैदानावर हजारो स्त्रीपुरुष गुलाबी कपडे घालून उपस्थित राहिले आणि सिडनीचे मैदान गुलाबी झाले.

Leave a Comment