शाहरुखने म्हणून केली होती मन्नतची खरेदी

mannat
बॉलीवूड बादशाह शाहरुख खान याच्या बांद्रा बँडस्टँड या मुंबईच्या उचाभ्रू वस्तीत असलेल्या अलिशान मन्नत बंगल्याची एक झलक पाहायला मिळावी म्हणून रोज शेकडो सिनेरसिक येथे येतात आणि या हवेलीच्या समोर सेल्फी काढून घेतात. शाहरुखने मन्नत का खरेदी केला त्याची हकीकत त्याने एका मुलाखतीत सांगितली होती.

शाहरुख मुळचा दिल्लीकर. त्याचे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले. तो अभिनय क्षेत्रात काही करण्यासाठी मुंबईत आला तेव्हा त्याचे गौरीबरोबर लग्न झालेले होते. सुरवातीला तो मुंबईत एका अपार्टमेंटमध्येच भाडे तत्वावर राहत होता कारण मुंबईची संस्कृती तशीच आहे. मात्र त्याच्या सासूने म्हणजे गौरीच्या आईने इतक्या छोट्या घरात का राहता असा सवाल केला. तेव्हा शाहरुखने २००१ साली मन्नत खरेदी केला. या अलिशान बंगल्याचे मूळ नाव विला व्हिएन्ना होते. शाहरुख सांगतो दिल्लीच्या लोकांना कोठी म्हणजे हवेलीत राहण्याची फार हौस. मन्नत म्हणजे दिल्लीवाली कोठी हीच अशी शाहरुखची खात्री झाली आणि त्यावेळी १३.३२ कोटी रुपयात त्याने हा बंगला खरेदी केला.

आज या बंगल्याची किंमत २०० कोटी असून जगातील १० महागड्या घरात त्याचा समावेश आहे. शाहरुखने सिनेसृष्टीत आजपर्यंत ५१०० कोटींची कमाई केल्याचे व दरवर्षी तो किमान २५६ कोटी कमावत असल्याचे सांगितले जाते. शाहरुख जगातील श्रीमंत सेलेब्रिटी मध्ये सामील आहे. त्याने मन्नतवर आजपर्यंत सर्वाधिक खर्च केला आहे.