बालीतील समुद्राखालाचे सुंदर मंदिर

bali1
इंडोनेशियातील बाली बेट म्हणजे अनोख्या, अद्भुत आणि सुंदर पर्यटनाचा गाभा असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. मुस्लीमबहुल इंडोनेशियात या बेटावर हिंदू संस्कृतीचे जतन मोठ्या काळजीने केले गेले आहे. स्वच्छ किनारे, विविधरंगी संस्कृती आणि हिरवळीची सतत सोबत यामुळे जगभरातील पर्यटक या बेटावर येत असतात. परिणामी येथे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्पा यांची सुविधा आहेच पण आखलेल्या बजेटमध्ये बालीची सहल सहज होऊ शकते.

gautam
या छोट्याश्या बेटावर अनेक मंदिरे आहेत आणि वर्षभर तेथे सतत कोणत्याना कोणत्या मंदिरांच्या जत्रा सुरूच असतात. याच बालीत आणखीही एक अनोखे मंदिर असून तेथे जाण्यासाठी मात्र थोडे साहस हवे. हे मंदिर भग्न स्वरुपात आणि समुद्राखाली ९० फुट आहे. पेमुतेरान बीचवरून या मंदिरात जाता येथे. समुद्राखाली असल्याने ते अनेक पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय आहे.

samudra
हे प्राचीन मंदिर सध्या भग्न अवस्थेत आहे. मुलाचे हे शिवमंदिर पण येथे विष्णूची मुर्तीही आहे. ही मूर्ती ५ हजार वर्षे जुनी असावी असा अंदाज आहे. श्रीकृष्णाची समुद्रात बुडालेली द्वारका हीच असाही दावा केला जातो. येथे अन्य अनके मूर्ती आहेत. येथे प्राचीन काळी पूजा अर्चा होत असे असेही सांगतात. बुद्ध मूर्ती येथे पहायला मिळतात. मात्र येथे जाण्यासाठी स्कुबा डायविंग करून किंवा पोहत जावे लागते. समुद्राखालाची ही शांत आणि सुंदर जागा ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच पाहायला हवी.

Leave a Comment