अर्धकुंभ, महाकुंभ आणि सिंहस्थ मध्ये हा आहे फरक

kumbh
येत्या १५ तारखेपासून प्रयागराज येथे सुरु होत असलेल्या अर्धकुंभ मेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. हिंदू धर्मियांसाठी कुंभ पर्वणी हि अतिशय पवित्र मानली जाते. मात्र अर्धंकुंभ, सिंहस्थ कुंभ आणि कुंभ यात थोडा फरक आहे. प्रत्येकाचे महत्व वेगळे आहे आणि भारताच्या विविध तीर्थक्षेत्री हे कुंभ होतात. कुंभ याचा अर्थ कलश. याचा संबंध थेट समुद्रमंथनाशी आहे.

देव आणि दानव यांनी जेव्हा अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून विविध चौदा रत्ने बाहेर आली. त्यात अमृतकुंभ बाहेर आला तेव्हा तो मिळावा यासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये लढाई सुरु झाली त्यात कलश हिस्कावण्याच्या नादात अमृताचे काही थेंब पृथ्वीवर ३ नद्यांमध्ये पडले. ज्या तीन नद्यांत हे थेंब पडले त्या गंगा, गोदावरी आणि क्षिप्रा या नद्या होत. त्यामुळे प्रयाग, हरद्वार, नासिक आणि उजैन येथे कुंभमेला होतो.

कुंभ पर्व दर तीन वर्षांनी हरीद्वार येथे सुरु होते.. दोन कुंभ पर्वामध्ये होणारा अर्धकुंभ. तो दर सहा वर्षांनी होतो. आणि सिंहस्थ कुंभ म्हणजे गुरु ग्रह सिंह राशीत आल्यानंतर होणारा सिंहस्थ कुंभ. तो दर १२ वर्षांनी होतो. ज्यावेळी गुरु सिंह राशीत तर सूर्य मेष राशीत असतो. अश्या वेळी होणारा कुंभ म्हणजे महाकुंभ. हा कुंभ मध्यप्रदेशातील उजैन मध्ये भरतो. जेव्हा सिंह राशीत गुरु प्रवेश करतो तेव्हा होणारा कुंभ नाशिक येथे होतो. याला सिंहस्थ कुंभ म्हणतात. हा कुंभही १२ वर्षातून एकदा होतो. या काळात तेथील नदीत स्नान केल्यास अमृताचा लाभ होतो असा विश्वास आहे.

Leave a Comment