राहुल गांधी पंतप्रधान बनणार का? शशी थरूर यांना रोबोटचा प्रश्न

shashi-tharoor
“राहुल गांधी पंतप्रधान बनणार का,” असा प्रश्न एकाने शशी थरूर यांना विचारला. मात्र हा प्रश्न विचारणारी व्यक्ती पत्रकार नव्हती तर एक यंत्रमानव होती.

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे ’21 व्या शतकात शिक्षणाच्या नवीन पध्दती या विषयावर इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर फ्यूचरिस्टिक एज्युकेशन अँड रिसर्च आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात हे दृश्य पाहायला मिळाले. भविष्यातील तंत्रज्ञानाचे प्रवाह या विषयावर यावेळी सादरीकरण करण्यात आले. तेव्हा हा प्रसंग घडला.

यावेळी रोबोटच्या प्रश्नाला “कदाचित” असे उत्तर देऊन थरूर यांनी वेळ निभावली. ”भाजपविरोधात वारे वाहत आहेत. त्यामुळे पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार येईल आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पुढील पंतप्रधान होतील,” असे थरूर म्हणाले.

इनकारा असे नाव या यंत्रमानवाला दिले आहे. इनकाराने प्रसारमाध्यमांवरील हल्ले आणि केरळमधील सध्याच्या हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारले.

थरूर यांनी वापरलेल्या वादग्रस्त दीर्घ शब्द “हिप्पोपोटोनोस्ट्रोसिसिपिपिडालिओफोबिया”बद्दलही इनकाराने प्रश्न विचारले आणि त्यांनी असे शब्द वापरण्याचे प्रमाण कमी करण्यासही सांगितले. या शब्दाचा अर्थ ‘दीर्घ शब्दांचा भीती’ असा आहे आणि लोकांच्या आणि रोबोटच्याही दृष्टीने अशी भीती चांगली नसल्याचे उत्तर त्याला थरूर यांनी दिले.

Leave a Comment