लोकसभा निवडणूक लढवण्यावर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

ujjawal-nikam1
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून निकम यांच्या नावावर शुक्रवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत उज्ज्वल निकम यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

उज्ज्वल निकम यांना लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत यावर काहीही बोलणे टाळल्यामुळे निकम हे नक्की निवडणूक लढवणार का, याबाबतचा संभ्रम अजून वाढला आहे. दरम्यान, लोकसभा रणनीती ठरवण्याबाबत राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याच बैठकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत खलबते झाली असल्याची चर्चा आहे. पण पुढील निर्णय निकम यांची सहमती घेतल्यानंतरच घेण्यात येणार आहे.

Leave a Comment