सिडनी कसोटी – तिस-या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ बाद २३६

team-india
सिडनी – अपुऱ्या प्रकाशामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला असून ऑस्ट्रेलियाने आजच्या दिवसअखेर ६ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली. ७ बाद ६२२ धावांवर भारताने पहिला डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद २४ धावा करण्यात यशस्वी ठरली.

उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने आज दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर सावध सुरुवात करत संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पण त्यानंतर उस्मान ख्वाजा (२७) बाद झाला. खेळपट्टीवर दुसऱ्या सत्रात स्थिरावलेला हॅरिसदेखील बाद झाला. त्याने ७९ धावा केल्या. पाठोपाठ शॉन मार्श ८ धावांवर बाद झाला. चांगली सुरूवात मिळालेला लॅबसचेंज ३८ धावा करून माघारी परतला. नंतर ट्रेव्हिस हेड २० धावा करून बाद झाला. तर तिसऱ्या सत्रात पहिल्याच षटकात कर्णधार टीम पेन (५) तंबूत परतला. कुलदीप यादवने सर्वाधिक ३ बळी घेतले. सध्या हँड्सकॉम्ब २८ आणि कमिन्स २५ धावांवर नाबाद आहे.

Leave a Comment