एकमेव टी-20सामन्यासाठी टीम साऊथी न्यूझीलंडचा नवा कर्णधार

tim-southee
ऑकलंड – श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकमात्र टी-२० सामन्यासाठी आक्रमक फलंदाजी आणि धारदार गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टिम साऊथीची कर्णधार म्हणून निवड केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने याची घोषणा केली.

५४ टी-२० सामने ३० वर्षीय टिम साउथी खेळला असून त्याने त्यात ६३ बळी घेतले आहेत. साउथी हा न्यूझीलंड संघाचा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आहे. तो फलंदाजीत मोठे-मोठे फटके मारण्यात माहीर आहे. त्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार मारले आहे. टिमने न्यूझीलंडकडून १३५ एकदिवसीय तर ६३ कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. हा ११ जानेवारीला ऑकलंडमध्ये एकमेव टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. या संघात नियमित कर्णधार केन विलियम्सन, ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रँडहोम आणि मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीडला विश्रांती देण्यात आली आहे. स्टीड यांच्या गैरहजरीत क्रेग मॅकमिलन प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहणार आहे. अनेक दिवसानंतर अष्टपैलू मिचेल सेंटनरचे पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज स्कॉट कुगलीन १३ सदस्यीय संघातील नवा चहेरा आहे. आतापर्यंत त्याने केवळ दोनच एकदिवसीय सामने खेळले आहेत.

न्यूझीलंडचा टी-२० संघ – टिम साऊथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), स्कॉट कुगलीन, कॉलिन मुनरो, जेम्स नीशाम, हेनरी निकोलस, ग्लेन फिलिप्स, सेठ रेंस, मिशेल सेंटनर, ईश सोढी

Leave a Comment