नसीरुद्दीन शहा यांना जे वाटले ते बोलले – संजय राऊत

sanjay-raut
नवी दिल्ली – नसीरुद्दीन शहा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतात लोकशाही आहे. नसीरुद्दीन शहा यांचा मी आदर करतो. ते उत्तम अभिनेते असल्याचे म्हटले आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन देशात होत आहे असे मला वाटत नाही. नसीरुद्दीन यांचा मी आदर करतो. ते उत्तम अभिनेते असून जे त्यांना वाटले ते बोलले, असेही राऊत म्हणाले.

माणसाच्या जीवापेक्षा गायीच्या जीवाची किंमत देशात जास्त आहे. मला अशा या परिस्थितीत माझ्या मुलांच्या सुरक्षेविषयी फार काळजी वाटते. गोरक्षणाच्या नावाखाली देशात होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नसीरुद्दीन शहा यांनी हे वक्तव्य केले होते. देशातील सद्यस्थितीमुळे संताप येतो. एका पोलीस अधिकाऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे गाईचे प्राण आहेत. संपूर्ण समाजात विष पसरले आहे. या परिस्थितीची मला फार भीती वाटते. अचानक जमावाने माझ्या मुलाला घेरले आणि तुम्ही हिंदू की मुस्लीम असा प्रश्न विचारला तर काय होईल, या विचाराने मी घाबरलो असल्याचेही शहा म्हणाले होते.

Leave a Comment