भारतीय विद्यार्थ्यांनी बनवली देशातील पहिली विनाचालक सौर उर्जेवर चालणारी बस

bus
नवी दिल्ली – देशातील पहिली स्मार्टबस पंजाबच्या ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या (एलपीयू) विद्यार्थ्यांनी बनवली असून केवळ सौर उर्जेवरच ही बस धावणार असे नाही तर चालकाची देखील या बसमध्ये गरजच नाही. ही बस 106 व्या ‘इंडियन सायंस काँग्रेस’मध्ये सादर करण्यात आली. जवळपास 6 लाख रुपये एवढी पूर्णतः प्रदूषणमुक्त असलेल्या या बसची किंमत आहे.
bus1
या प्रकल्पावर गेल्या पाच वर्षांपासून काम करत होतो, 12 महिन्यांचा वेळ बसचा सगळा प्रोग्रॅम सेट करण्यास लागला, अनेक स्मार्ट फिचर्स यामध्ये अॅड करण्यात आले आहेत. बसच्या वरच्या भागात कॅमेरा लावण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने बसच्या मार्गावरील अडथळ्यांची किंवा मार्गाची माहिती गोळा होते आणि बस त्यानुसार धावते. या प्रकल्पात जवळपास 300 विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मनदिप सिंग यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त द विकने दिले आहे.
bus2
सौर उर्जेच्या सहाय्याने बसमधील मोटर सुरू होते आणि याद्वारे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ही बस चालकाशिवाय 30 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. तसेच चालकासह बस चालवण्याचा पर्यायही यामध्ये आहे. बसच्या मागील आणि पुढील बाजूला सेंसर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गात काही अडथळा असल्यास ही बस आपोआप थांबेल किंवा 10 मीटर आधीच अलर्ट देईल. या बसने एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर 10 ते 30 प्रवाशांसह 70 किमीपर्यंतचा प्रवास करता येईल. जीपीएस आणि ब्ल्यूटुथचा नेव्हिगेशनसाठी वापर केला जातो. या बसवर 10 मीटरच्या परिसरातूनही कंट्रोल करता येणे शक्य आहे.

Leave a Comment