राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकमत – पटेल

praful-patel
मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांनी आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागांबाबत एकमत झाले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादी हे मित्रपक्ष आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये एकत्र लढणार असून आतापर्यंत ४० जागांबाबत जागावाटप चर्चेत एकमत झाले असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप आठ जागांवर निर्णय बाकी असून चर्चेद्वारे त्यावरही लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत ४० जागांबाबत बोलणी जागावाटप चर्चेत झाली असून २०-२० जागांचा सकारात्मक निर्णय झाला आहे. लवकरच ८ जागांचा निर्णयही होईल. इतर मित्र पक्षांसोबाबतही चर्चा होणार असून आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी व्हावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरद्वारे दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी बैठकही झाली. उर्वरित ८ जागांचा निर्णयही लवकरच होईल. काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीला महाराष्ट्रातून चांगले यश मिळेल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment