शी जिनपिंग यांनी चिनी सैन्यदलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे दिले निर्देश

jingping
बीजिंग – चिनी सैन्यदलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी निर्देश दिले असून जिनपिंग यांनी शुक्रवारी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना युद्धाच्या तयारीसाठी शक्य असेल ते सर्व काही करा असे स्पष्ट निर्देश दिले.

चीनने आपल्या सैन्यदलाला दक्षिण चीन सागरात चीनचे शेजारी देशाबरोबर असलेले वाद तसेच व्यापारापासून तैवानच्या दर्जाबद्दल अमेरिकेबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्षम आणि भक्कम करण्यावर भर दिला आहे. जिनपिंग यांनी जमलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना चीनसमोरील धोके आणि आव्हाने वाढत असल्यामुळे सैन्यदलांनी सुरक्षा आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम केले पाहिजे असे सांगितले असल्याची ही माहिती शिन्हुआ या अधिकृत वृत्तसंस्थेने दिली आहे.

केंद्रीय लष्करी आयोगाचे अध्यक्ष असलेले शी जिनपिंग म्हणाले की, नव्या युगाच्या दृष्टीने सैन्यदलांनी रणनिती तयार केली पाहिजे तसेच युद्धाच्या तयारीची जबाबदारी घेतली पाहिजे. आणाबाणीने प्रसंगात तात्काळ कारवाई करण्यासाठी सैन्य दलांनी सक्षम असले पाहिजे तसेच संयुक्त कारवाई करण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

Leave a Comment