शुक्रवारीच नवे चित्रपट रिलीज होण्यामागे ही कारणे

films
देशभरातील सिनेरसिक दर शुक्रवारची आतुरतेने वाट पाहत असतात कारण या दिवशी नवे चित्रपट रिलीज केले जातात. बॉलीवूडवर हॉलीवूडचा प्रभाव किती आहे यासंबंधी वेगळे काही भाष्य करण्याची गरज नाहीच. तर शुक्रवारी नवे चित्रपट रिलीज करण्यामागे हॉलीवूडची कॉपी आहे. बॉलीवूडमध्ये ही प्रथा १९६० पासून सुरु झाली तर हॉलीवूड मध्ये १९३९ पासून ती रुळली.

हॉलीवूडचा प्रचंड गाजलेला ऐतिहासिक यश मिळविलेला गॉन वुईथ द विंड हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला होता आणि त्याला मिळालेले अभूतपूर्व यश पाहून हॉलीवूड मध्ये शुक्रवारी नवा सिनेमा रिलीज करण्याची प्रथा रुळली. तेथे गुरुवारी नव्या सिनेमाचा प्रीमिअर होतो.

हिंदी सिनेसृष्टीत २४ मार्च १९४७ साली आलेला नीलकमल हा सिनेमा सोमवारी रिलीज झाला होता मात्र तो साफ आपटला. मात्र शुक्रवारी, ५ ऑगस्ट १९६० साली रिलीज झालेल्या मुगल ए आझमने उत्पनांचे रेकोर्ड केले. या सिनेमाला मिळालेले यश आश्चर्याचा विषय बनले होते. तेव्हापासून बॉलीवूड सिनेमे शुक्रवारी रिलीज केले जाऊ लागले.

दुसरे कारण म्हणजे शुक्रवार हा कामाचा आठवड्यातला शेवटचा दिवस त्यामुळे लोक कुटुंबासह या दिवशी एन्जॉय करण्यास प्राधान्य देतात आणि त्यात मनोरंजन महत्वाचे असते. तिसरे कारण म्हणजे शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार, या दिवशी सिनेमा रिलीज केला तर त्यातून चांगली प्राप्ती होईल असा निर्मात्यांचा विश्वास असतो. मात्र नियमाला अपवाद असतो. त्यानुसार राकेश मेहराचा रंग दे बसंती बुधवारी आणि सुलतान गुरुवारी रिलीज होऊनही त्यांनी चांगला व्यवसाय केला आहे.