इंडिअन ऑइलची पेट्रोल डीझेल घरपोच सेवा सुरु

doorstep
ऑनलाईन खरेदी प्रमाणात दररोज वाढ नोंदविली जात असताना आता डीझेल आणि पेट्रोल सारखे इंधन ग्राहकांना ऑनलाईन मिळू लागले आहे. इंडिअन ऑइल कार्पोरेशनने या इंधनाची घरपोच डिलिव्हरी देणारी सेवा सुरु केली असून त्याची सुरवात चेन्नईतील कोलावूर पेट्रोल पंपापासून केली गेली आहे.

या संदर्भात एचपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक एम.के. खुराना म्हणाले, हि सेवा देण्यात काही अडचण नाही. गेल्या सप्टेंबर मध्ये होम डिलिव्हरी देण्याचा निर्णय घेतला गेला होता आणि आता इंडिअन ऑइलने इंधन तुमच्या दारात योजना सुरु केली आहे. या सुरवातीला ग्राहक किमान २०० लिटर ते कमाल २५०० लिटर इंधनासाठी ऑनलाईन ऑर्डर बुक करू शकणार आहे. हे इंधन त्याला घरपोच दिले जाईल.

काही पेट्रोल पंप चालकांनी या योजनेला विरोध सुरु केला असून या योजनेमुळे आत्महत्या वाढतील अशी भीती व्यक्त केली आहे.