अवघे 101 रुपये देऊन घेऊन जा व्हिवोचा स्मार्टफोन

vivo
नवी दिल्ली – चीनमधील स्मार्टफोन कंपनी व्हिवोने नव्या वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. तुम्ही जर स्मार्टफोन विकत घेण्याचा खरेदी करायचा विचार करत असाल, तर केवळ १०१ रुपये देऊन व्हिवोचा स्मार्टफोन घरी घेऊन जाऊ शकता. व्हिवो V११ व्हिवो V११ प्रो आणि व्हिवो Y९५ या स्मार्टफोनसाठी या ऑफरमध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. ‘न्यू फोन, न्यू यू.’ असे ऑफरला नाव देण्यात आले आहे.१०१ रुपयांचे डाऊनपेमेंट या ऑफरमध्ये करुन ६ महिन्याच्या सुलभ हफ्त्याने स्मार्टफोन खरेदी करु शकता.

ही ऑफर व्हिवोस्टोअर किंवा ज्या ठिकाणी व्हिवोचे सर्व स्मार्टफोन उपलब्ध असतील अशा स्टोअरमध्येच मर्यादित कालावधीसाठी आहे. ३१ जानेवारीपर्यंत ऑफरचा कालावधी मर्यादित आहे. १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक दर असलेल्या स्मार्टफोनची खरेदी या माध्यमातून करु शकता. स्मार्टफोनची पूर्ण किंमत ग्राहकांना द्यावी लागणार, पण सुरुवातीला केवळ १०१ रुपये देऊन ते स्मार्टफोन खरेदी करु शकतात. कॅशबॅकसारखी सुविधा हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी वेगळी ऑफर देण्यात आली आहे. एचडीएफसीच्या कार्डवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के सवलत मिळणार आहे.