देना आणि विजया बँकेच्या विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

bank
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रीमंडळाकने देना आणि विजया बँकेच्या विलिनीकरणाला मंजूरी दिली आहे. बँक आँफ बडोदामध्ये दोन्ही बँकाचे विलिनीकरणला केंद्रीय मंत्रीमंडळाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. नुकताच या संदर्भातील निर्णय घेण्यात आला.

‘बँक ऑफ बडोदा’ ही विलिनीकरणाच्या या प्रक्रियेनंतर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आणि आयसीआयसीआय बँकेनंतर भारतातील तिसरी मोठी बँक बनणार आहे. ग्राहक कर्ज पुरवठ्याच्या नियमावलीत आणि बँक कर्मचाऱ्यांच्या नियमावलीत कुठलाही बदल विलिनीकरणाच्या या प्रक्रियेनंतर होणार नसल्याचे सांगण्यात आले. बडोदा बँकेला जागतिक दर्जाची बँक बनविण्यासाठी हे विलिनीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

Leave a Comment