मुलीचा गोंडस फोटो रोहित शर्माने केला शेअर

rohit-sharma
नव्या पाहुण्याचे भारताचा उपकर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माच्या घरी आगमन झाले असून 30 डिसेंबरला एका गोंडस मुलीला रोहित शर्माची पत्नी रितिकाने जन्म दिला. रोहित शर्मा आपल्या मुलीला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतला आहे. रोहित शर्माने दरम्यान आपल्या मुलीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मुलीचा चेहरा रोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोत दिसत नाही आहे. फोटोत रोहित शर्मा आणि रितिकाचा हात दिसत असून मुलीने त्यांची बोटे पकडलेली दिसत आहे.


आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत रोहित शर्माने १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते. रोहित शर्मा-रितिका लग्नाच्या तीन वर्षानंतर आई-बाबा झाले आहेत. मुलगी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ३० डिसेंबरला रोहित शर्मा मुंबईला रवाना झाला. यामुळे चौथ्या कसोटीत तो खेळत नाही आहे. ८ जानेवारीला पुन्हा ऑस्ट्रेलियात येऊन एकदिवसीय सामन्यात तो खेळणार आहे.

Leave a Comment