९० वर्षापूर्वीचा विक्रम पुजाराने मोडला

cheteshwar-pujara
सिडनी – भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत केवळ ७ धावांनी द्विशतक हुकले. तरीही एक नवा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केला आहे. पुजारा ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सर्वाधिक चेंडू खेळणारा पहिला विदेशी खेळाडू बनला आहे. ९० वर्षापूर्वीचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. या मालिकेत त्याने १२५८ चेंडू खेळले आहेत. पुजाराने १९३ धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.

इंग्लंडच्या हर्बट सटक्लिफच्या नावावर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम होता. १९२८ साली झालेल्या अॅशेस ४ सामन्यांच्या मालिकेत त्यांनी ७ डावात १२३७ चेंडू खेळून काढले. त्यात त्यांनी १ शतक आणि २ अर्धशतकांच्या साहाय्याने ३५५ धावा काढल्या. ही मालिका इंग्लंडने ४-१ ने जिंकत अॅशेसवर नाव कोरले.

Leave a Comment