मोदींनी यापूर्वीच्या पंतप्रधानांप्रमाणे पत्रकार परिषद घ्यावी – शत्रुघ्न सिन्हा

shatrughan-sinha
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी एएनआयला दिलेली मुलाखत ही पूर्वनियोजित असल्याची टीका केल्यानंतर भाजपचे बिहारमधील खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील मोदींच्या या मुलाखतीवर टीका केली आहे. मोदींची मुलाखत खात्रीदायक नसल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. तसेच यापूर्वीच्या पंतप्रधानांप्रमाणे मोदींनी पत्रकार परिषद घ्यावी, असेही सिन्हा यांनी सुचविले आहे.

सिन्हा यांनी मोदींची मुलाखत ‘वेल स्क्रिप्टेड’, कोरिओग्राफ्ड, वेल रिसर्चड् होती, अशी टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी पूर्वीच्या पंतप्रधानांप्रमाणे पत्रकार परिषद घेण्याची ही योग्य वेळ असल्याचेही सिन्हा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात एकही पत्रकार परिषद न घेतल्याची टीका सिन्हा यांनी केली.

Leave a Comment