भारतीय लष्करचे सामर्थ्य वाढवणार स्वदेशी बनावटीची ‘धनुष’ तोफ

dhanush
जयपूर – भारतीय सैन्यामध्ये स्वदेशी बनावटीच्या पहिल्या-वहिल्या ‘धनुष’ तोफा दाखल होणार असून भारतीय लष्कराचे सामर्थ्य धनुष्य तोफेच्या समावेशामुळे वाढणार आहे. या धनुष तोफा जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या भारतीय सीमेवर तैनात करण्यात येतील.

लष्कराकडे सर्वप्रथम ६ तोफा फेब्रुवारी महिन्यात सुपूर्द करण्यात येणार आहेत. तर, जवळपास १२ तोफा यावर्षी भारतीय सैन्याला मिळतील. या तोफा नाशिक येथील ‘स्कूल ऑफ आर्टलिरी’ देवळाली येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भारतीय सैन्य दलाकडे सुपूर्द करण्यात येतील.

१५५ बाय ४५ कॅलिबरची गन धनुष या तोफेमध्ये बसवण्यात आली आहे. अमेरिकेतील ‘होवित्जर एम-७७७’ गन आणि कोरियाची ‘के-९’ वज्र बंदूकही यामध्ये बसवण्यात आली आहे. ३० किलोमिटर पर्यंत होवित्जर मारा करू शकते. तर, के-९ या बंदूकीमध्ये ३८ किलोमीटरपर्यंत मारक क्षमता आहे. धनुष या तोफेचे ९० टक्के भाग भारतात बनलेले आहेत. जबलपूर येथील कॅरेज कंपनीमध्ये बनली आहे. पुढील ३ वर्षात ११४ धनुष तोफा भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment