पंजाबमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार मोफत स्मार्टफोन

punjab
पंजाब सरकारने विद्यार्थ्यांच्या हातात आता मोफत स्मार्टफोन येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सरकारी शाळा, महाविद्यालये आणि तांत्रिक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना हे स्मार्टफोन मिळणार आहेत.

राज्य सरकारच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याकडे एकही स्मार्टफोन नसल्याचे शपथपत्र द्यावे लागणार आहे. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात मोफत स्मार्टफोन वाटप करण्याचे आश्वासन दिले होते.

या योजनेसाठी नाव ठरविण्याचे अधिकार मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना दिले आहेत, असे राज्य सरकारच्या प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितले.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना टचस्क्रीन, कॅमेरा आणि अॅप असलेले फोन देण्यात येणार आहेत. याशिवाय 12 जीबी डाटा आणि 600 मिनिटांचा स्थानिक टॉक टाईमही देण्यात येईल. त्याची व्हॅलिडिटी एक वर्ष असेल. या योजनेतील फोनचे वाटप मार्च महिन्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
पंजाब सरकारच्या क्रीडा व युवक खात्याने या योजनेचे तपशील ठरविण्याकरिता एप्रिल 2017 मध्ये एक समिती नेमली होती. मात्र ऑगस्ट 2017मध्ये या समितीची पुनर्रचना करून उद्योग विभागाला या योजनेसाठी मध्यवर्ती संस्था म्हणून नेमण्यात आले.

Leave a Comment