पाकिस्तानातील प्राचीन हिंदू धर्मस्थळाला राष्टीय स्मारक दर्जा

tirath
पाकिस्तानच्या खैबर पख्तून प्रांतात पेशावर येथे असलेल्या पंज तीरथ या प्राचीन हिंदू धर्मस्थळाला पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय वारसा घोषित केले आहे. येथे पाच तलाव, एक मंदिर आणि खजुराची बाग असून या ठिकाणचा संबंध महाभारत काळाशी असल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात कि पांडवांचे वडील पांडू राजा कार्तिक स्नानासाठी या ठिकाणी येत असे आणि येथे झाडांखाली पूजा अर्चा करत असे.

पाकिस्तानच्या पुरातत्व विभागाने या संदर्भात एक अध्यादेश जारी केला असून पंज तीरथ हा देशाचा ऐतिहासिक वारसा असल्याचे जाहीर केले आहे. १७४७ साली अफगाणी दुराणी यांनी या स्थळाचे खूप नुकसान केले होते मात्र १८३४ मध्ये शीख शासनातील हिंदू स्थानिकांनी या ठिकाणाची पुन्हा उभारणी केली. येथे पाच तलावांचे पाणी येते आणि हे पवित्र स्थान मानले जाते. पाक सरकारने या ठिकाणाचे नुकसान करणाऱ्याला २० लाख रु. दंड आणि ५ वर्षे तुरुंगवास अश्या शिक्षेची तरतूद केली आहे.

या जागेच्या आसपास असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले गेले असून येथे सुरक्षेसाठी सीमा भिंत बांधली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment