मॅगी टेस्टी असेल पण हेल्दी नाही- कोर्टाचा दणका

maggi
टेस्टी भी हेल्दी भी अशी जाहिरात करून नुडल्स बाजारात लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेल्या नेस्लेच्या टू मिनिट नुडल मॅगीला सुप्रीम न्यायालयाने चांगलाच झटका दिला असून कंपनीला ६४० कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारला द्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नेस्ले इंडिया समोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

२०१५ मध्ये अनेक राज्यातील मॅगीचे नमुने अन्न औषध प्रशासनाने तपासले तेव्हा त्यात शीशे या धातूचे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मॅगी वर खाद्य सुरक्षा ब्युरोने बंदी घातली होती. त्यानंतर कंपनीने उत्पादनात सुधारणा केल्याचे सांगून पुन्हा हे उत्पादन बाजारात आणले आणि नेस्लेने सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाविरोधात याचिका दाखल केली. मात्र कंपनीच्या वकिलांनी मॅगी मध्ये शीशे प्रमाण थोडे जास्त असल्याची कबुली दिली. खाद्य सुरक्षा आयोगाने यामुळे कंपनीने ६४० कोटी रु. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

आहारात शिसे धातूचे प्रमाण अधिक झाल्यास त्यामुळे मूत्रपिंडे आणि नर्व्हस सिस्टीम खराब होऊ शकते. त्यामुळे मॅगीने हेल्दीभी, टेस्टी भी असा जाहिरातीत केलेला दावा खोटा ठरला आहे. यामुळे सरकारने खोटी जाहिरात करणे, खोटे लेबलिंग आणि अनुचित व्यापार पद्धत याविरोधात नुकसान भरपाई मागितली आहे.

Leave a Comment