दरवर्षीप्रमाणे यंदाही जिनेव्हा येथे होणाऱ्या ऑटोशो मध्ये भारतीय कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स तब्बल पाच नवी मॉडेल्स सादर करणार असून त्यात सर्वाधिक आकर्षण ठरणार आहे ती मिनी एसयूव्ही हॉर्नबिल. हे या कारचे कोडनेम असून दरवर्षी टाटा या शोमध्ये कॉन्सेप्ट मॉडेल सादर करतात.
जिनेव्हा ऑटो शो मध्ये टाटांची हॉर्नबिल मुख्य आकर्षण
मिळालेल्या माहितीनुसार हॉर्नबिल कडे कारप्रेमींचे विशेष लक्ष असून हि कार ४५ बेस्ड प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. या कारला १.२ लिटर ३ सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल व १.०५ लिटर ३ सिलिंडर रीव्होटोर्क टर्बो डीझेल इंजिन दिले जाणार असून टाटांच्या टियागोला हाच इंजिन ऑप्शन आहे. २०१८ च्या ऑटोशो मध्ये हॉर्नबिल च्या छोटा व्हिडीओ दाखविला गेला होता. या कारच्या डिझाईनवर हॅरिअर, नेक्सॉनच्या प्रभाव असून हॉर्नबिल २०२० मध्ये बाजारात दाखल होईल असे समजते.