खेळण्याच्या दुनियातील सम्राज्ञी बार्बी होतेय साठ वर्षांची

barbie
खेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची होत आहे. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे. बार्बी कोणत्याची वयाच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसताक्षणी हास्य फुलविते अशी तिची ख्याती आहे.

doll
९ मार्च १९५९ साली अमेरिकेतील मेटल कंपनीने बार्बी बाजारात आणली. म्हणजे या मार्च मध्ये ती साठ वर्षे पूर्ण करेल. पण तिची चमक आणि मोहिनी तसूभरही कमी झालेली नाही. या बाहुलीची प्रेरणा रुथ हँडलर हिला तिच्या मुली आणि मुलीच्या मैत्रिणीवरून मिळाली. रूथची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी पुठ्ठ्याच्या बाहुल्यांशी खेळत आणि तरीही खूप खुश असत. त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात यावी यासाठी रुथने खूप जपानी खेळणी खरेदी केली आणि त्यावर अनेक प्रयोग करून त्यातून नितांतसुंदर बार्बी साकारली.

barbie1
ही रुपसुंदरी बार्बी लाँच झाल्यावर पहिल्याच वर्षात ३ लाख बाहुल्या विकल्या गेल्या यावरून ती मुलांनी किती भावली हे सिद्ध होते. ट्विटर, इन्स्टाग्राम वरही बार्बी आहे आणि ट्विटरवर तिचे २० लाख फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment