ओप्पो आर १७ प्रो किंग ऑफ ग्लोरी स्पेशल एडिशन फोन लाँच

glory
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पोने त्याच्या फ्लॅगशिप आर १७ प्रो फोनपाठोपाठ मोठा डाव टाकताना याच फोनची स्पेशल एडिशन आर१७ प्रो किंग ऑफ ग्लोरी नावाने लाँच केली आहे. ही एडिशन किंग ऑफ ग्लोरी थीम आणि प्रीइंस्टॉल्ड गेम्स सह मिळणार आहे.

आर १७ प्रो प्रमाणेच या फोनला ६.४ इंची अमोलेड डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह असून इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे. हे मॉडेल फक्त ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरी व्हेरीयंट मध्येच मिळणार आहे. रिअरला ट्रिपल कॅमेरा असून त्यातील प्रायमरी कॅमेरा १२ एमपीचा आहे. २० एमपीचा सेकंडरी शुटर कॅमेरा असून तिसरा ऑफ फ्लाईट थ्री डी कॅमेरा आहे.

सेल्फी साठी ब्युटी मोडसह २५ एमपीचा कॅमेरा दिला गेला असून हा फोन अँड्राईड ८.१ ओरिओ ओएस ला सपोर्ट करतो. फोन ला सुपरफास्ट चार्जिंग बॅटरी आहे आणि या फोन साठी टेन्सेन्ट गेम्स बरोबर कंपनीने भागीदारी केली आहे. फोनच्या बॅक मध्ये किंग ऑफ ग्लोरी ब्रँडिंग असून चीन मध्ये या फोनची किंमत ४२९९ युआन आहे.