चीनने चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणा-या भागावर उतरवले ‘चांग ई-४’ यान

china
बिजींग – चंद्राच्या पृष्ठभागापासून दूर अंतरावर उतरणारे चीनचे अंतराळ यान ‘चांग ई-४’ पहिले यान ठरले असून अंतराळ क्षेत्रातील हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

हे यान चंद्राच्या पृष्ठभागावरील खडक, मातीचे नमुने एकत्र करून चंद्राचा इतिहास आणि भूगर्भीय स्थितीवरील संशोधनास सहाय्य करेल. हे यान चंद्राच्या दुर्लक्षीत दक्षिण ध्रुवावरील एटकेन बेसिन या चंद्रावरील अत्यंत दुर्मिळ, जुन्या व खोलगट भागात उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चांग ई ४ मोहिमेतील या यशाने चीन चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. जेव्हा उपकरणांना कोणतेही नुकसान पोहोचु नाही म्हणुन यान मंदगतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले गेले. यालाच यानाचे सॉफ्ट लँडींग म्हणतात. जगात हे तंत्रज्ञान सध्या केवळ चीनकडेच आहे.

Leave a Comment