लोकसभा निवडणूक लढवणार प्रवीण तोगडिया !

parvin-togadia
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी एका महिन्याच्या आत पक्ष स्थापन करुन लोकसभा निवडणूक लढवणार, असल्याचे म्हटले आहे. जोधपूरच्या एकदिवसीय दौ-यावर तोगडिया आहेत.

पुढे ते म्हणाले, की पक्ष स्थापना करण्याची तयारी सुरू झाली असून लवकरच पक्षाचे नाव ते घोषित करतील. प्रत्येक आघाडीवर भाजप सरकार अपयशी ठरला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. देशाला एका नव्या पर्यायाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्येत राम मंदिर बांधणी, जम्मू-काश्मीरातील हिंदुंचे पुनर्वसन, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांना रोजगार यावर मोदी सरकारने काहीच केले नाही. राम मंदिर निर्माण, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि वालमार्टमुळे बंद पडलेल्या लघुउद्योगांना सुरू करण्यासाठी त्यांचा पक्ष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment