आता मराठीतही पारो अन् ‘देवदास’चा प्रवास

devdas
प्रख्यात बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ या कादंबरीवर आधारित विविध भाषांमध्ये देवदास चित्रपट बनला. आता मराठीतदेखील हाच प्रयोग होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन एक अलबेला चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल करणार आहेत. सरतांडेल यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, आतापर्यंत अनेक भाषांत देवदास चित्रपट बनला. पण या चित्रपटाची आणि मूळ कादंबरीची कथा यात मला फरक जाणवला. या चित्रपटांतून तयार केलेली देवदासची दारूड्याची प्रतिमा बदलण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी म्हटले.

सुनील पातवळेकर यांनी या मराठी चित्रपटाची कथा लिहिली आहे. कोणता मराठी अभिनेता या चित्रपटात देवदासची भूमिका साकारणार आणि कोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार याबद्दलची माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. सध्या या कलाकारांची निवड चालू असल्याचे दिग्दर्शकांनी म्हटले आहे.

Leave a Comment