आपल्या कार्यकाळातच मोदी सरकारने राम मंदिर बांधावे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

dattatreya-hosabale
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. ते त्याच्या जोरावरच सत्तेत आले असल्यामुळे मोदी सरकारने आपल्या कार्यकाळातच राम मंदिर बांधावे, अशी लोकांची अपेक्षा असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी हे विधान नरेंद्र मोदींच्या राम मंदिराच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

मोदींनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. त्यानंतरच सरकार याबद्दल निर्णय घेईल, असे म्हटले होते. येत्या ४ जानेवारीला राम मंदिरावर सुनावणी होणार आहे. पण, राम मंदिराच्या निर्माणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आग्रही असल्याचे दिसत आहे. संघाने म्हटले आहे, की आपल्या कार्यकाळातच मोदींनी राम मंदिराचे निर्माण करावे. यावर्षीच मोदींचा कार्यकाळ संपत आहे. संघाने ही अपेक्षा मोदींकडून व्यक्त केली आहे. तरीही मोदींचे वक्तव्य सकारात्मक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment