अजय देवगणचा ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

ajay-devgan
सध्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये बॉलिवूड सिंघम म्हणजेच अजय देवगण आणि तब्बू व्यस्त आहेत. पडद्यावरील या जोडीची लोकप्रियता प्रचंड आहे. अशात या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच अजयचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे.


अजयचा हटके अंदाज या फोटोत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अकिव अली दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांशिवाय जिमी शेरगिलही महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. भूषण कुमार आणि अंकुर गार्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा नक्की काय असेल हा अंदाज लावणे कठीण आहे. पण याचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment