विराटला कडकनाथ कोंबडी खाण्याचा सल्ला

kadak
विराट सारख्या खेळाडूना अधिक सकस आहार हवा आणि त्यासाठी चरबी आणि कोलेस्टेरॉलची अजिबात काळजी न करता त्याने हे दोन्ही घटक जवळजवळ नसलेला आणि तरीही आवश्यक उर्जा देणाऱ्या कडकनाथचा आहारात समावेश करावा असा सल्ला त्याला दिला गेला आहे. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने चिकन मध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉल अधिक प्रमाणात असल्याने शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या मीडियात झळकल्यानंतर झाबुआ कडकनाथ संशोधन केंद्र (कृषी विज्ञान केंद्र) चे प्रमुख आय.एस. तोमर यांनी विराट साठी एक खास पत्र लिहिले असून ते ट्विटरवर पोस्ट केले आहे.

तोमर म्हणतात, विराटने चरबी आणि कोलेस्टेरॉल जादा असल्याने ग्रिल्ड चिकन सोडले हे वाचले. कडकनाथ कोंबड्याचा आहारात समावेश विराटसाठी योग्य ठरेल. यात आयर्न आणि लुरिक अॅसिडचे प्रमाण चांगले आहे त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेस मध्ये कमतरता राहणार नाही. विराट सारखे खेळाडू देशाची शान आहेत. त्यामुळे मी हे पत्र लिहिले आहे. खेळाडूंसाठी आम्ही पुरेश्या प्रमाणात कडकनाथ उपलब्ध करून देऊ शकतो.

झाबुआने कडकनाथ साठी भौगोलिक ओळख टॅग मिळविण्यासाठी सहा महिने लढा दिला होता. त्यामुळे आता हा कोंबडा झाबुआचा कडकनाथ नावाने ओळखला जातो.

Leave a Comment