क्रिकेट क्षेत्रातील महान गुरु रमाकांत आचरेकर कालवश

ramakant
पद्मश्री आणि द्रोणाचार्य अश्या महान पुरस्कारांनी सन्मानित क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी मुंबई येथे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडूलकर याचे ते बालपणाचे कोच. सचिन बरोबरच अजित आगरकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे अश्या अनेक प्रसिद्ध खेळाडूना घडविण्याचे श्रेय आचरेकर सरांकडे जाते.

रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म १९३२ सालचा. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर ते युवा खेळाडूना क्रिकेटचे प्रशिक्षण देत. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती सचिनचे गुरु म्हणून. सचिन सरांविषयी बोलताना म्हणतो, स्वर्गात क्रिकेट असेल तर सर ते समृद्ध करतील. मी क्रिकेटची बाराखडी त्यांच्याकडेच शिकलो. माझ्या आयुष्यात त्यांचे जे योगदान आहे ते शब्दात सांगणे शक्य नाही. मी आज जो कुणी आहे तो त्यांच्यामुळे. गुरुपौर्णिमेला सचिन त्यांच्या पाया पडतानाचा फोटो त्याने शेअर केला आहे.

१९९० साली त्यांना मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार दिला गेला तर २०१० साली पदमश्री. २०१० साली त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार दिला गेला होता. मुंबई क्रिकेट टीम निवड समितीवर त्यांनी काम केले होते.

Leave a Comment