हुवाई वाय ९ या महिन्यात भारतात होणार लाँच

y9huvai
व्हिएतनाम मध्ये लाँच झाल्यानंतर चीनी स्मार्टफोन कंपनी हुवाई त्यांचा नवा वाय ९ हा स्मार्टफोन जानेवारीत भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनचे टीझर अमेझोनवर येऊ लागले आहेत. हा मिडरेंज स्मार्टफोन आहे. भारतात हा साधारण २० हजार रुपायांच्या दरम्यान मिळेल असे समजते.

या फोनला ६.५ इंची फुल एचदि स्क्रीन गोरिला ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. अँड्राईड ८.१ ओरिओ ओएस, ४ हजार एमएएच बॅटरी, रिअरला दोन कॅमेरे पैकी पहिला एलइडी फ्लॅशसह १६ एमपीचा तर दुसरा २ एमपीचा आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी १३ व २ एमपीचे ड्युअल कॅमेरे दिले गेले आहेत. हा फोन ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज व ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज अश्या दोन व्हेरीयंट मध्ये उपलब्ध असून त्याची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ४०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे.