लाईमलाईट पासून दूर, मुकेश अंबानींची सुंदर मेहुणी ममता दलाल

mamata
देशातील बडे उद्योजक आणि रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची पत्नी नीता एकाद्या बॉलीवूड अभिनेत्री इतकीच चर्चेत असते. नीता यांची स्टाईल आणि लुक नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र त्यांची बहिण ममता फारशी कधीच सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाही इतकेच काय पण अंबानी परिवाराच्या कार्यक्रमातही ती फारशी दिसलेली नाही.

खरेतर ममता सौंदर्याच्या बाबतीत काकणभर सरस आहे मात्र तिला मुळातच साधी राहणी आवडते त्यामुळे प्रसिद्धी पासून ती दूर आहे. ममता धीरूभाई अंबानी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तिची लाईफस्टाईल अंबानी परिवारापेक्षा खूप वेगळी आहे. धीरूभाई अंबानी शाळेत बॉलीवूड स्टार आणि सेलेब्रिटीची मुले शिकतात. ममता सांगते, विद्यार्थी मग तो शाहरुखच्या मुलगा, मुलगी असो अथवा सचिन तेंडूलकरचा असो माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत. ते माझे विद्यार्थी आहेत आणि मी शिक्षिका. हेच नाते मला अधिक महत्वाचे वाटते.