येथे खाण्यासाठी नाही तर अजगरासोबत सेल्फी साठी येतात खवय्ये

reptile
सर्वसामान्यपणे लोक रेस्टॉरंट किंवा हॉटेल मध्ये जातात ते पोटपुजेसाठी. मात्र कंबोडियातील एक रेस्टॉरंट गर्दीने नेहमी गजबजलेले असूनही येथे लोक खाण्यासाठी नाही तर येथील सरपटणाऱ्या प्राण्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतात. रेप्टाइल कॅफे असे या रेस्टॉरंटचे नाव असून ते कंबोडियाची राजधानी नोम पे येथे आहे.

येथे खायच्या टेबलावर अजगर, सरडे, पाली, विंचू असे प्राणी ठेवले जातात. त्यात पांढरा अजगर आणि नारंगी साप विशेष लोकप्रिय आहेत. टेबलावर लोळत असलेल्या अजगराबरोबर अथवा हे अजगर गळ्यात घालून महिला वर्गही मोठ्या प्रमाणावर सेल्फी काढतो. त्यासाठी काहीही चार्ज आकाराला जात नाही. मित्रपरिवारासोबत कॉफी पिणे आणि अजगर, साप यांच्यासोबत सेल्फी घेणे यासाठी येथे गर्दी होते.

Untitled-1
यापूर्वी कंबोडियामध्ये असेच एक कॅट रेस्टॉरंट होते. थायलंड मध्येही असे कॅफे आहेत मात्र तेथे ग्राहकांकडून सरपटणाऱ्या प्राण्यांसोबत सेल्फी घेण्यास फार पसंती मिळालेली नाही.