देशातील या ठिकाणी फक्त 60 रूपयांत मिळते पोटभर जेवण, पण त्यासाठी आहे एक अट…

hotel
रायपूर- दुकानदार नेहमीच आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कलुप्त्या काढत असतात. एका हॉटेल मालकाने अशीच एक ऑफर ठेवली आहे. फक्त 60 रूपयांत त्या हॉटेलमध्ये पोटभर जेवण मिळते पण यासाठी मालकाने एक विचीत्र अट ठेवली आहे.

हरीश धर्मावत यांचे रायपुरमध्ये स्टेशन रोडवर शुद्ध शाकाहारी गजानंद भोजनालय आहे, जे अंदाजे 35 वर्षे जुने आहे. त्याला त्यांनी मोठ्या भावासोबत मिळून सुरू केले होते. मोठे भाऊ देवीलाल आता या जगात नाहीत, पण त्यांचा मुलगा दिनेश धर्मावत काका हरीशसोबत भोजनालय चालवतात. या हॉटेलमध्ये एक नियम आहे, ज्याला जितके खायचे आहे तितके खाऊ शकते. पण तेथील एक नियम आहे, तो म्हणजे जर ताटात अन्न सोडले तर 10 रूपये दंड भरावा लागेल आणि उरलेले अन्न खावे लागेल.

पण यात काही सक्ती केली जात नाही, तुमच्याकडून चुकून अन्न ताटात राहिले किंवा पोट भरले असले म्हणून तुम्ही अन्न ठेवले तर दंड घेऊन ते अन्न जनावरांना दिले जाते. अन्न वाढतानाच ग्राहकाला या नियमाबद्द्ल सांगितले जाते. अनेक वर्षांपासून लोक या हॉटेलमध्ये जेवायला येतात. हरीश यांनी सांगितले की, लोलांना त्यांच्या या भावनेचा आदर आहे, त्यामुळे कोणीच ताटात अन्न टाकत नाही. तर दिवसभरातील उरलेले अन्न ते रात्री स्टेशनवरच्या गरीबांना दिले जाते. भोजनालयमध्ये ओडिसाचे स्वयंपाकी जेवण तयार करतात. त्यांच्या हाताचे जेवण करण्यासाठी लोकांची लाइन लागलेली असते. अंदाजे 15 वर्षांपासून जेवण बनवणारे स्वयंपाकी सुरेश यादव यांच्या हाताचे जेवण खाण्यासाठी लोकांना वाट पाहावी लागते.

Leave a Comment