नरेंद्र मोदींकडून शबरीमलातील महिलांच्या प्रवेश बंदीचे समर्थन

narendra-modi
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम धर्मातील तिहेरी तलाक हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. लिंगभाव समानतेचा मुद्दा आहे. पण, शबरीमला हा धार्मिक आस्थेचा मुद्दा असल्याचा अजब तर्क दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी शबरीमलातील महिलांवरील बंदीचे समर्थन केले. एका वृत्तसंस्थाच्या मुलाखती दरम्यान त्यांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी हे विधान त्यावेळी केले.

सरकारने मुस्लीम धर्मातील तिहेरी तलाकच्या प्रथेवर निर्णय घेतला. सरकारने या प्रकरणात पुरोगामी पाऊल उचलले. पण, सरकारची शबरीमलाच्या बाबत भूमिका परंपरेला चिकटून राहण्याची आहे. हा विरोधाभास नाही का, असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला. मोदींनी त्याला अजब तर्क देत उत्तर दिले.

तिहेरी तलाकवर जगभरातील इस्लमीक देशांनी बंदी घातली असल्यामुळे तो श्रद्धेचा मुद्दा नाही. हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. लिंगभाव समानतेचा मुद्दा असल्याचे मोदी म्हणाले. तर, त्यांनी शबरीमलाच्याबाबत धर्माच्या परंपरेची री ओढली. शबरीमलामध्ये महिलांना असणाऱ्या बंदीचे त्यांनी यावेळी समर्थन केले. देशात काही मंदिर आहेत जिथे पुरुष जात नाहीत. तर काही मंदिरात महिला जात नाहीत. हा त्या मंदिराच्या आस्थेचा मुद्दा आहे, असे मोदी म्हणाले. तरी देखील भारत हा सगळ्यांना समान अधिकार मिळावे या मताचा देश असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Leave a Comment