उत्तर प्रदेशात मुस्लिम करणार गोहत्या करणाऱ्यांचा बहिष्कार

cow
गोहत्या आणि गोमांस विक्रीच्या तक्रारीवरून उठणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मुस्लिमांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. येथील एका गावातील मुस्लिम समुदायाने अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुरादनगर जिल्ह्यातील रावली रोड मुरादनगर येथे झालेल्या पंचायत सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. मुस्लिमांसह गैरमुस्लिमांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. गाईची हत्या करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

माजी उपाध्यक्ष भूर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी ही पंचायत बैठक आयोजित केली होती. काही लोक गाईची हत्या करतात आणि शहराच्या शांततेत व्यत्यय आणतात, असे त्यांनी सांगितले.

गाईची हत्या करताना किंवा गोमांस विक्री करताना कोणताही मुस्लिम व्यक्ती आढळला तर त्याला कोणीही मदत करणार नाही आणि त्याच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्यात येईल, असे यावेळी ठरविण्यात आले.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे गेल्या महिन्यात मृत गाईचे अवशेष सापडल्याच्या कारणावरुन जमाव हिंसक झाला. त्यानंतर झालेल्या दंगलीत एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गोमांस व गोहत्या हे विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले आहे.

Leave a Comment