मोदींनी माझ्याशी देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करावी – चंद्राबाबू नायडू

chandrababu-naidu
नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी देशाला मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात काय फायदा झाला यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याशी चर्चा करावी असे आव्हान दिले आहे. त्यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारच्या काळात देशाने आर्थिक वाढीचा अपेक्षित दर गाठला का असा सवाल उपस्थित केला.

यावर नायडू म्हणाले, आर्थिक वाढीचा दर तत्कालीन यूपीए सरकारच्या काळातही चांगला नसेल. पण या सरकारच्या काळातही हा चांगला नाही. आर्थिक वाढ जीएसटी आणि नोटाबंदीमुळे झाली का, असा सवाल त्यांनी केला. देशाची आर्थिक प्रणाली मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी माझ्याशी आर्थिक मुद्यांवर चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी हा झटका नव्हता तर आम्ही एक वर्ष आधीपासून सांगत होतो की काळ्या पैशाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, असे मुलाखतीत सांगितले. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे दिला. त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता असे मोदी यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment