आयफोनसाठी त्याने विकली किडनी, आता आयुष्य जाणार खाटेवर

iphone
आयफोन विकत घेण्यासाठी आपले मूत्रपिंड विकणाऱ्या एका तरुणाला नियतीच्या अजब खेळाला सामोरे जावे लागले आहे. आता त्याचे दुसरे मूत्रपिंडही खराब झाले असून त्याला आपले संपूर्ण आयुष्य रुग्णशय्येवर घालवावे लागणार आहे.

शिओ वांग असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या शाळेतील मित्रांवर प्रभाव पाडण्यासाठी त्याने सुमारे सात वर्षांपूर्वी वांग याने आपली एक किडनी विकली होती. त्यावेळी त्याचे वय 17 वर्षांचे होते. त्याच्या मूत्रपिंडाच्या बदल्यात त्याला 3,200 अमेरिकी डॉलर (सुमारे दोन लाख 23 हजार 265 रुपये) मिळाले होते. त्यातून त्याने आयफोन 4 विकत घेतला होता.

त्यावेळी हॉस्पिटलने वांग याला सांगितले होते, की शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्यात तो ठीक होईल आणि एका किडनीवर तो जगू शकेल. मात्र शस्त्रक्रियेनंतर स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे त्याच्या दुसऱ्या मूत्रपिंडात इन्फेक्शन झाले.

आता त्याला केवळ रुग्णालयातील खाटेवर जगावे लागत असून त्याला आयुष्यभर डायलिसिस करावे लागणार आहे. विशेष म्हणजे वांगने याबाबत आपल्या आई-वडिलांना काहीही सांगितले नव्हते. त्यांना याची माहिती उशिरा मिळाली आणि आता वांगच्या उपचारांचा खर्च करण्यात त्यांची तारांबळ उडत आहे.

Leave a Comment