तुम्ही चाखली आहे का ‘दीपिका पादुकोण डोसा आणि थाळी’ची चव

deepika-padukone
बॉलीवुडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोणची चर्चा अगदी लग्नापासून होत आहे. पण या चर्चेचे आता कारण थोडे वेगळे आहे. संपूर्ण जगभरात दीपिकाचे चाहते आहे. फॅन्स क्लबदेखील तिच्या चाहत्यांकडून चालवले जातात. पण आता एक वेगळीच आणि हटके गोष्ट समोर आली आहे.

सध्या सोशल मीडियावर दोन मेन्यू कार्ड व्हायरल झाले आहेत. यामध्ये चक्क दीपिकाच्या नावाचा ‘डोसा’ आणि ‘पराठा थाली’ मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील ऑस्टिनमधला खालील फोटो आहे. ‘दीपिका पादुकोण डोसा’ येथील डोसा लॅब्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये मिळत आहे.


या डोसा यादीत वेगवेगळे व्हरायटीची नावे यामध्ये दिली गेली आहेत. दीपिका पादुकोणच्या नावाचा देखील ज्यामध्ये उल्लेख आहे. या दीपिका पादुकोण डोसामध्ये सर्वात तिखट मिरची गोस्ट चिली आणि आलू मिक्सचा स्वाद मिळतो. या मेन्यूची किंमत 10 डॉलर ठेवण्यात आली आहे. तर पुण्यातील एका रेस्ट्रॉरंटमध्ये दीपिकाच्या नावाची थाली मिळत आहे. मेनू कार्डमध्ये ‘दीपिका पादुकोण पराठा थाली’ मिळत आहे. ग्राहकांना या थालीत भाजी, राजमा – छोले, दाल मखनी, रोटी, भात, सलाड, पापड, स्वीट डिश मिळणार आहे. ग्राहक या थालीसाठी 600 रुपये मोजत आहेत.

भगत सिंह, युवराज सिंह, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, यो यो हनी सिंह सारख्या कलाकारांच्या नावाच्या थाली देखील व्हायरल झालेल्या या मेन्यू फोटोमध्ये आहेत. सगळ्यात महाग थाली दारा सिंह नावाची असून याची किंमत 2400 रुपये लिहिण्यात आली आहे.

Leave a Comment